राज्याच्या राजकारणात पुतण्याच्या वाट्याला आलेली हेटाळणी याही निवडणुकीत पाहीला मिळतेय . अजीत पवार असो वा मग घनंजय मुंडे किंवा राज ठाकरे . प्रत्येकाला राजकारणाच्या प्रवासात काकांक़डुन मिळाली ती दुय्यम वागणुकच ...
काका मला वाचवा .... महाराष्ट्राच्या राजकारणात हे वाक्य आजरामर होउ पहातय .... आणि पुतण्यांची बंडखोरीही . काका पुतण्याच्या नात्यातला हाच वारसा राज ठाकरे आणि अजीत पवार यांच्या नंतर घनजय मुंडे यांच्या कडे आलाय. धनंजय गेली अनेक वर्ष बिड जिल्ह्यात काका गोपिनाथ मुंडे यांच्या मतदार संघाचं काम सांभाळत आले ... भाजपं मधे त्याना छोटी मोठी पदही मिळाली .... मुंडेचा राजकिय वारसदार धनंजय होणार असं बोललं जाऊ लागलं .... २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गोपिनाथ मुंडे राष्ट्रीय राजकारणाच्या वारिला निघाले आणि धनजयं आता मुंडेच्या परळी विधानसभा मतदारसंघातुन निवडणुक लढवणार अशी शक्यता निर्माण झाली मात्र इथेही रक्ताच नात आडवं आलं आणि धनजंय बाबत मतदारसंघात नाराजी असल्याचं सांगुन मुंडेनी मुलगी पंकजा मुंडेला तिकीट दिलं.
धनंजय सारखीच हेटाळणी अजीत पवारांच्या वाट्याला आलीय ... २००४ पर्यत राजकारणाशी सुतरामही संबंध्द नसलेल्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुले .... महीला... बालविकास , शिक्षण या क्षेत्रात काम करत होत्या ... राजकारणाच्या वाट्याला आपल्याला जायचं नाही असंही सुचवित होत्या .... पवारांनी सुप्रियाच्या राजकिय प्रवेशाला नकारचं दाखवला होता मात्र २००९ उजाडे पर्यत सुप्रिया खासदार झाल्या .... पवारांनी गेली चालीस वर्ष सुरक्षित असा बारामती मतदार संघ वारसा हक्कानं सुप्रियाला दिला ... अजित पवारांना मात्र लोकसभा निवडणुकीत मैदाना बाहेरच राहावं लागलं .
भाजपं आणि राष्ट्रवादीत जे घडलं तेच शिवसेनेतही ...बाळासाहेबांच्या पुत्र प्रेमामुळे २००४ साली शिवसेनेचं कार्यकारी अध्यक्षपद उध्दव ठाकरे यांच्याकडे आलं ... आणि त्यातुन निर्माण झालेली पुतण्या राज ठाकरे यांची धुरपुस बंडखोरीच्या रुपानं समोर आली महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाची भर पडली ...... उध्दव ठाकरे बाबतची नाराजी राज ठाकरे यांनी उघडपणे व्यक्त केली मात्र काका आपल्यासाठी विठ्ठलाच्या जागी आसल्याच्या पलीकडे बाळासाहेबांच्या पुत्र प्रेमावर मात्र राज ठाकरे यांनी कधीच टीका केली नाही.
या सर्व् काका पुतण्या कथांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्या या नात्याला हेटाळणी आणि बंडखोरीचा शापचं मिळालाय असं म्हणालयला काही हरकत नाही