Monday, 12 March 2012

थर्ड फ्रंट'ची चर्चा आणि पवारांच पंतप्रधानपदाचं स्वप्न ......


उत्तर प्रदेशच्या निवडणूकांच्या निकालांनी देशात राजकिय अस्थिरतेला मार्ग मोकळा करुन दिलाय .यातच पवार आता युपीए बरोबरचं तिस-या मोर्चाच्या दगडावरही पाय ठेवत पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुन्हा उतरताना पाहया मिळू शकतात

    युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स ..... म्हणजे कॉग्रेस प्रणित युपीए .
         नॅशनल डेमोक्रॅटीक अलायन्स ......बीजेपी प्रणित एनडीए
         आणि छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय राजकारण करण्यासाठी तयार केलेली एक आघाडी म्हणजे third front …

प्रकाश सिंग बादल यांच्या पंजाबच्या मुख्यमंत्री पदाच्या शफतग्रहण समारंभात third front ची ही मोट पुन्हा बांधली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शरद पवार , कन्या सप्रिया सोबत हजेरी लावणार आहेत . ममता बैनर्जीनी ही आपले दुत या कार्यक्रमाला पाठवण्याची घोषणा या आगोदरचं केलीय .हा कार्यक्रम एनडीए चा असला तरी स्टेजवरून मात्र third front चे नेते देशात मध्यावधी निवडणूकांच्या शक्यतेची नांदी देतील. या परिस्थितीत सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे वेध लागलेल्या शरद पवारांना पुन्हा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत धावण्याची संधी निर्माण होईल .

२००९ च्या निवडणूकाच्या वेळी पवार अधिकृतपणे 'थर्ड फ्रंट' च्या प्रचारसभेला उपस्थिती राहिले होते .. त्यावेळी राष्ट्रवादीची बीजू जनता दलाशी आघाडी होती . यावेळी मात्र अकाली दलाशी पवारांचे असलेली मैत्री इतकच कारण आहे .

पंजाब आणि उत्तर प्रदेशात सत्तेत आलेल्या अकाली दल आणि समाजवादी पक्षाने आपापल्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी विविध पक्षांचे नेते आणि देशभरातील मुख्यमंत्र्यांना निमंत्रणे पाठवली आहेत. त्यात भाजपप्रणित एनडीए आणि काँगेसप्रणित यूपीएतील घटक पक्षांचाही समावेश असल्याने 'थर्ड फ्रंट'चा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे.

युपीए २ मधे मित्रपक्षांना विश्वासात घेतलं जात नाही ... काही एक कॉग्रेसचे नेतेचं सरकार चालवतात अशी टीका होत होती मात्र त्यावेळी पवारांचा हात दगडा खाली होता . आता कॉग्रेसचा हात दगडा खाली आहे .

थर्ड फ्रंट'ची चर्चा आणि तृणमूल काँग्रेससह इतर काही मित्रपक्षांशी दुरावलेले संबंध या पार्श्वभूमीवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी यूपीएतील घटकपक्षांना आपल्या निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिल. साहजिक आहे प्रादेशिक पक्षांवर कारवाईचा सपाटा लावणा-या कॉग्रेसला आता याच पक्षासमोर नाक घासण्याची पाळी आली आहे .
निलेश खरे – स्टार माझा – मुंबई



No comments:

Post a Comment